प्रतिनिधी/ येळ्ळूर
येथील अरवाळी धरण तुडुंब भरले आहे. या धरणात दररोज सराव करणारे येळ्ळूर येथील अनेक तरुण तसेच ज्ये÷ नागरिक आहेत. त्या सर्वांनी नारळी पौर्णिमेनिमित्त धरणाच्या ठिकाणी पूजा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून या धरणात दररोज पहाटे पोहायला जाणारे तरुण आहेत. त्यांची कमिटीही आहे. त्यामार्फत हे गंगापूजन करण्यात आले. यावेळी डॉ. पी. टी. मुचंडी, विनोद चतुर, यल्लाप्पा तोपिनकट्टी, डॉ. सतीश पाटील, पांडुरंग सुळगेकर, सतीश देसूरकर, अभिजित सांबरेकर, सतीश बी. पाटील, विलास खादरवाडकर, रवी धामणेकर, बाळू धामणेकर, देवराज धामणेकर, कृष्णा बिजगरकर, प्रकाश मालुचे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









