वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंध्रप्रदेशातील श्री सत्यसाई जिह्यातील एका बांधकामाधीन पेपर मिल परिसरात राहणाऱ्या एका महिलेसह तिच्या सुनेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री चिलामंथूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोघांचेही पती नल्लाबोमणी पल्ली परिसरातील एका बांधकामाधीन मिलमध्ये चौकीदार म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्याच कंपाऊंडमध्ये राहत होते. 11 ऑक्टोबरच्या रात्री दुचाकींवरून आलेल्या एका टोळक्याने त्यांच्या घरासमोर गोंधळ घातला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने दोन्ही पुरुषांना बांधून ठेवत महिलांवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद झाली असून पोलीस टोळक्याचा शोध घेत आहेत. सदर कुटुंब बळ्ळारी जिह्यातील असून ते पाच महिन्यांपूर्वीच तेथे राहायला आले होते.









