कोल्हापूर :
इचलकरंजी आणि कुरुंदवाड शहर व परिसरामध्ये दशहत निर्माण करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील इचलकरंजी येथील कुख्यात कोणे गँगला जिह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले. हद्दपार करण्यात आलेल्यामध्ये गँगचा म्होरक्या शुभम संजय कोणे (रा. जुना चंदूर रोड, बरगे मळा, इचलकरंजी) याच्यासह त्याच्या तीन साथिदाराचा समावेश आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यामध्ये गँग प्रमुख शुभंम संजय कोणे, त्याचे साथिदार अर्जुन महेश महेश निवाते (रा. दाते मळा, इचलकरंजी), चैतन्य उर्फ गणेश जटाप्पा माळी (रा. जुना चंदुर रोड, बरगे मळा, इचलकरंजी), विशाल नरसिंग जाधव (रा. लिंबु चौक, संत मळा, इचलकरंजी) या चौघांचा समावेश आहे.
कोणे गँग विरोधी कुऊंदवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार कऊन, तो मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाची नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी तो प्रस्ताव गडहिंग्लजचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे पाठविला. त्यांनी तो प्रस्ताव चौकशीअंती पुढील कारवाईकरीता पोलीस अधीक्षकांच्याकडे पाठविला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गँगच्या प्रमुखासह त्याच्या साथिदारांना सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडण्याची वेळ दिला. पण सुनावणीमध्ये गँगच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्याने, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोणे गँगचा प्रमुखा शुभम कोणेसह त्याचे साथिदार अर्जुन निवाते, चैतन्य माळी, विशाल जाधव या चौघांना कोल्हापूर जिह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपारीचा आदेश पारित कऊन, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याकडे पाठविला. कुऊंदवाड पोलिसांनी याची तत्काळ अंमलबजावणी केली.








