प्रतिनिधी,कोल्हापूर
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत टायमिंगला इंट्री मिळवण्यासाठी मंडळांमध्ये जोरदार ईर्षा असते.काही मंडळे साऊंड सिस्टीम, लेसरसाठी ट्रॅक्टर व स्ट्रक्चर जोडण्यास दोन दिवस आधीच सुरुवात करतात.अशा मंडळांवर कारवाई करण्याचे काम शहर वाहतूक शाखेने सुरु केले आहे.सोमवारी रात्री स्ट्रक्चर जोडणाऱ्या दोन मंडळांच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली.मंडळांनी बुधवारी रात्री बारानंतर विसर्जन मार्गावर साऊंड सिस्टीम,ट्रॅक्टर जोडावेत अन्यथा मंडळांवर कारवाई केली जाईल,असा इशारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला. यंदा गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील वाहतूक मार्गात बदल केल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदाही 3 मिरवणूक मार्ग
मार्ग पहिला : उमा टॉकीज ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक ते टेंबे रोड देवल क्लब ते मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर ते महाव्दार रोड ते पापाची तिकटी ते गंगावेश पाडळकर मार्केट ते रंकाळा स्टॅंड जॉकी बिल्डींग ते संध्यामठ ते तांबट कमान इराणी खण.
मार्ग दुसरा : उमा टॉकीज चौक ते आझाद चौक ते दुर्गा चौक ते बिंदू चौक ते शिवाजी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते पापाची तिकटी ते गंगावेश रंकाळा स्टँड संध्यामठ ते तांबट कमान ते राजकपुर पुतळा ते इराणी खण.
मार्ग तिसरा : उमा टॉकीज सिग्नल चौक ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक ते गोखले कॉलेज चौक ते यल्लमा ओढा ते हॉकी स्टेडीयम ते निर्माण चौक ते इंदिरासागर ते संभाजीनगर ते देवकर पाणंद चौक ते क्रशर चौक इराणी खण.
मंडळांसाठीचे मिक्सिंग पॉइट
व्हिनस चौक ते विल्सन पूल ते फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज ते आझाद चौक ते दूर्गा हॉटेल ते बिंदू चौक ते शिवाजी पूतळा ते पापाची तिकटी पुढे मार्गस्थ.
व्हिनस कॉर्नर ते कोंडा ओळ ते फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज पुढे मार्गस्थ.
फोर्ड कॉर्नर ते आईसाहेब महाराज पुतळा ते पद्मा चौक ते बिंदू चौक ते शिवाजी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चप्पल लाईन ते पापाची तिकटीवरुन पुढे मार्ग.
नंगीवली चौक ते कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटी ते पुढे.
खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर ते पुढे मार्ग प्रमाणे.
ताराबाई रोड रंकाळा ते साकोली कॉर्नर ते तटाकडील तालीम ते महालक्ष्मी चौक पुढे.
अॅम्ब्युलन्स थांबण्याचे ठिकाण
घाटी दरवाजा, पापाची तिकटी, गंगावेश, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, इराणी खण, बिंदू चौक
महापालिकेकडील गणेशमूर्ती ने-आण करण्यासाठी मार्ग
इराणी खण येथे शहरातील कृत्रिम कुंडात विसर्जन,दान केलेल्या गणेश मुर्ती आणणारी वाहने इराणी खण-अंबाई टँक- शालिनी पॅलेसमार्गे जाण्यासाठी व इराणी खणीवर येण्यासाठी या मार्गाचा वापर करतील.
विसर्जनानंतर मिरवणुकीतील सहभागी वाहनांना परतीचा मार्ग
शिवाजी पेठ,मंगळवार पेठ येथील मंडळांचे वाहनासाठी रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल चे पुढे तपोवन मैदान येथे थांबून रहातील. तसेच इंदिरा सागर संभाजीनगर येथील वाहतूक सुरळीत असेल तर आवश्यकतेनुसार तपोवन येथे पार्क केलेली वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येतील.
राजारामपुरी येथील मंडळांच्या वाहनासाठी रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका,चिवा बाजार,साई मंदिर कळंबा,कळंबा जेलचे पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर,आर.के.नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाषनगर उद्यमनगर अगर सायबर चौकमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
– शाहूपुरी येथील मंडळांच्या वाहनांसाठी रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका,चिवा बाजार,साई मंदिर कळंबा,कळंबा जेलचे पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर,आर.के.नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाषनगर-उद्यमनगर-पार्वती टॉकीज सिग्नलमार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
– लक्ष्मीपुरी येथील मंडळांच्या वाहनांसाठी रावजी मंगल कार्यालय ते नवीन वाशी नाका, चिवा बाजार, साई मंदिर कळंबा, कळंबा जेल चे पुढे उजवीकडे वळण घेऊन रामानंदनगर येथून उजवीकडे वळण घेऊन जरगनगर, आर.के.नगर येथून शेंडा पार्क येथून सुभाषनगर उद्यमनगर- पार्वती टॉकीज सिग्नल,गवत मंडई,शाहूपुरी व्हिनस कॉर्नर,दसरा चौक.
वाहतुकीसाठी बंद व खुले केलेले मार्ग
– रत्नागिरीमार्गे शहरात येणारी मोटार वाहतूक शिवाजी पूल ते सी.पी.आर.चौक येथे येईल.शहरातून पन्हाळ्याकडे जाणारी वाहतूक सी.पी.आर. चौक. तोरस्कर चौक ते शिवाजी पूलमार्गे मार्गस्थ होतील.
– शहरातून गारगोटी, राधानगरी, गगनबावड्याकडे जाणारी व येणारी सर्व मोटार वाहतूक ताराराणी पुतळा रेल्वे उ•ाणपूल हायवे कॅन्टीन चौक सायबर कॉलेज चौक- रिंग रोडमार्गे हॉकी स्टेडीयम येथून डावीकडे वळण घेऊन रामानंदनगर ते कळंबा जेल-साई मंदिर-रिंग रोड, नवीन वाशी नाका व फुलेवाडी रिंगरोडने पुढे सोयीनुसार मार्गस्थ होतील.
-फुलेवाडी मार्गे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना फुलेवाडी नाका येथे प्रवेश बंद केला आहे. या वाहनानी फुलेवाडी रिंगरोड ते नवीन वाशी नाका ते कळंबा ते कळंबा जेल मार्गे रामानंदनगर, जरगनगर, आर.के. नगर, मोरेवाडी नाका, सुभाषनगर, एसएससी बोर्ड, एनसीसी भवन, सायबर चौक मार्गस्थ.
– शिये फाटा येथून कसबा बावडामार्गे शहरात येणारी सर्व प्रकारची अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जाऊन ती तावडे हॉटेल ते शिरोली टोल नाका मार्गे शहरात येऊन सोयीनुसार पुढे मार्गस्थ.
– कोल्हापूर शहरातून कसबा बावडामार्गे शिये फाटा व राष्ट्रीय महामार्गावर जाणारी वाहनेसुध्दा ताराराणी पुतळा ते शिरोली टोल नाका ते तावडे हॉटेलमार्गे शहराबाहेर जातील.
नो पार्किंग
गणेश विसर्जन मुख्य मार्गास जोडणाऱ्या उप मार्गावर मुख्य मिरवणूक मार्गापासून 100 मीटर परिसरापर्यंत सर्व प्रकारच्या मोटार वाहनाना नो पार्किंग करण्यात येत आहे.(अत्यावश्यक सेवेतील मोटार वाहनांना वगळून)
पार्किंग सुविधा
दसरा चौक, तोरस्कर चौक शाळा, शिवाजी स्टेडियम, 100 फुटी रोड, शाहू दयानंद हायस्कूल, पेटाळा मैदान, निर्माण चौक, दुधाळी, ताराराणी हायस्कूल मंगळवार पेठ, दुधाळी, दसरा चौक, गांधी मैदान, सिध्दार्थनगर कमान, संभाजीनगर बसस्थानक.