वार्ताहर/येळळूर
येळळूरमध्ये मोठ्या उत्साहात आणि सवाद्य घरगुती गणपतीचे आगमन झाले.सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत गणरायाच्या आगमनाची धामधूम सुरू होती. घरोघरी आगमनाच्या आधीपासूनच लोकानी उत्साहाने मकर सजावट करण्यास सुरुवात करून गणराच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. यामध्ये महिला वर्गही मागे नव्हता. त्यांच्या उत्साहालाही उधान आल होते. पावसाच्या रिमझिमासोबत फटाक्यांचा आणि सुतळी बॉम्बच्या आवाजात व वारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचे घरोघरी स्वागत करण्यात आले. मंगलमय वातावरणात पूजा करण्यात आली. घरगुती गणेशाच्या आगमनानंतर सार्वजनिक तरुण मंडळांनी जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात मिटवणुकीने आगमन झाले. यावेळी तरुणांच्या उत्साहाला उधान आले होत. मिरवणुकीत प्रामुख्याने पुरुषासह महिला भजनी मंडळांचा सहभाग लक्षणीय होता.









