Ganesh Satardekar’s dunk in bodybuilding competition
वेंगुर्ला येथे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘विशाल श्री‘ ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेत ‘विशाल श्री २०२२‘ हा किताब फिटनेस वॉरिअर मालवणच्या गणेश हनुमंत सातार्डेकर याने पटकाविला. तर एम्पाअर व्यायामशाळा कुडाळच्या विपुल सुरेश करलकर याने ‘मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डर‘ आणि श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ल्याच्या चंदन वासुदेव कुबल याने ‘बेस्ट पोझर‘ हे किताब पटकाविले. तसेच मेन्स फिजिक किताब टीम शिवाजी सावंतवाडीचे नंदकिशोर श्यामसुंदर गावडे यांनी पटकाविला.
भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मधूसुदन कालेलकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशाल महोत्सवातील ‘विशाल श्री‘ ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचाचे दीपप्रज्वलन करुन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते तर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. तर जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन मांद्रे-गोवा येथील विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांत विशाल परब मित्रमंडळाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रणव वायंगणकर, साई भोई, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ, संतोष गावडे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, रेडी सरपंच रामसिग राणे, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपू परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, निशांत तोरसकर आदी मान्यवरांचा समावेश होता.
वेंगुर्ला / प्रतिनिधी









