पणजी / विशेष प्रतिनिधी
सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे आज सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तत्पूर्वी ते गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा सरकारला सादर करतील. रमेश तवडकर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. 25 सप्टेंबर रोजी राज्य विधानसभेचे अधिवेशन होणार असून त्यात सभापतीपदाची निवडणूक होणार आहे.









