Ratnagiri New : कोकणात चाकरमान्यांच्या नियोजनासाठी एसटी आगारात शिक्षकांना ड्युटी लावण्य़ाचा आदेश शिक्षण मंडळाने काल घेतला आहे. याचे परिपत्रक जाहीर होताच रत्नागिरीतील शिक्षक संघटनेने याबबात आक्षेप घेतला आहे. प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना एसटी आगारात ८ तास ड्युटी लावली आहे. यामध्ये ३९ शिक्षकांची ड्युटी राजापूर आगारात लावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीमध्ये एकूण ८०० शिक्षक आहेत. यातील ३९ शिक्षकांची ड्युटी ही आगारात लावण्यात आली आहे. १३ दिवसामध्ये एका शिक्षकाला एकदा ड्युटी करण अनिवार्य आहे. दिवसातून तीन शिक्षक हे महसूल अधिकाऱ्यांच्या सोबत असतील असे नियोजन केरण्यात आलेले आहे. याचे परिपत्रक काल काढण्यात आले आहे. हे परिपत्रक काढत असताना शिक्षकांना विचारत घेतले असल्याचे प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनी सांगितले त्यानंतर हा आदेश काढला आहे अशी माहिती समोर आली आहे.
कोकणात दरवर्षी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात. कोकणात आल्यानंतर चहा पानी बिस्किट दिले जातात. यासाठी मोठी यंत्रणा कामास लागते. यंदा यासाठी ३९ शिक्षकांना ड्युटी देण्यात आली आहे. मात्र काही शिक्षक संघटनांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. तर काही शिक्षक शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या भेटीला गेले आहेत. केसरकरांच्या भेटीनंतर शिक्षक नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









