ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकीकडे राज्यासह देशभरात गणपती बाप्पाचं जल्लोषात होत आहे. परंतु दुसरीकडे सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिराचा (Mushroom Ganapati Temple) सोन्याचा कळस पुन्हा एकदा चोरीला गेला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2022) काळात मध्यरात्री मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोन्याचा कळस दुसऱ्यांदा चोरीला गेल्याने भक्तगण संतप्त झाले आहेत. यापूर्वी 2017 साली देखील मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता.
काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील मंदिरातून ऐतिहासिक मूर्त्या चोरीला गेल्यानं राज्यात खळबळ उडाली होती. परंतु आता राज्यात आजपासून गणेशोत्सव साजरा केला जात असतानाच आता सोलापूरातील प्रसिद्ध मश्रूम गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरी गेल्यानं खळबळ उडाली आहे. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हिप्परगा गावात मश्रूम गणपतीचं मंदिर आहे, या मंदिरावर २४ तोळ्यांच्या सोन्याचा कळस बसवण्यात आला होता. मध्यरात्री चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत सोन्याचा कळस चोरी केल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील तळेहिप्परगा गावात मश्रूम गणपतीचे मंदिर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी या मश्रूम गणपती स्थापन केला होता. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या योगदानातून गणपतीच्या मंदिरावर हा कळस बसवण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे काल (31 ऑगस्ट) पहाटे मंदिरात आल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचं समजलं. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मश्रूम गणपती मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यासाठी भाविकांनी पैसे जमा केले होते, त्यातून २४ तोळ्यांचा कळस तयार करून तो मंदिरावर बसवण्यात आला होता. परंतु मध्यरात्री चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत मंदिरावरील सोन्याचा कळस चोरून नेला आहे. मंदिराच्या परिसरात कोणतंही सीसीटिव्ही कॅमेरे नसल्यानं नेमकी ही चोरी कुणी केली किंवा यामागे कुणाचा हात आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. ऐन गणेशोत्सवाच्या मध्यरात्रीच मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला गेल्यानं भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला आहे.









