प्रतिनिधी/ बेळगाव
गांधी भारत कार्यक्रमासाठी शहरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मात्र, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसेच सात दिवसांचा दुखवटा पाळण्यात आल्याने सजविलेले विद्युत रोषणाईचे साहित्य हटविले जात आहे. सोमवार दि. 30 रोजी ठेकेदारांकडून सदर साहित्य टेम्पोत भरून ते बेंगळूरला नेण्यात आले.
महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याने काँग्रेसतर्फे शताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार होते. त्यासाठी सर्वत्र आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. पण अधिवेशन काळातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने कार्यक्रम रद्द झाला. 7 दिवसांचा दुखवटा पाळून विद्युत रोषणाई बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता सर्व साहित्य हटविले जात आहे.









