उचगाव / वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथील ट्रान्स्पोर्ट लाईनच्या गोडाऊनचे कुलुप तोडून करेक्शन पेन (व्हाईटनर), बॅटरी सेल असा एकूण १ लाख ८२ हजार चारशे रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद गोडावूनचे मालक नितीन नेभंनदास नरसिंगानी यांनी गांधीनगर पोलीसांत दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नितीन नेभंनदास नरसिंगानी (वय ३९ वर्षे, रा. पुण्य पर्व सोसायटी, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांचे गांधीनगर येथील ट्रान्स्पोर्ट लाईनला मारुती मंदिरा शेजारी गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केले. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास गोडाऊन उघडण्यास नितीन हे गेले असता गोडाऊनचे कुलुप उचकटल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोडाऊनमध्ये पाहिले असता, करेक्शन पेन (व्हाईटनर) ८०० नग, पॅनासोनिक बॅटरी सेलचे स्पेशन नावाचे ६ बॉक्स आणि पॅनासोनिक बॅटरी सेलचे गोल्ड नावाचे ५ बॉक्स असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपयांचा माल लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. नितीन नरसिंगानी यांनी याबाबत आज गांधीनगर पोलीसांत फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हे़डकॉन्स्टेबल विराज डांगे करत आहेत.