प्रतिनिधी,कोल्हापूर
गांधी मैदानात साचणारे सांडपाणी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी कामाचा अभ्यासपूर्वक आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने गांधी मैदानासाठी पाच कोटींची निधी मंजूर केला आहे. या निधीतून मैदानात साचणारे सांडपाणी रोखण्यासाठी कामे केली जाणार आहेत. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात नियोजनबद्ध काम व्हावे, यासाठी क्षीरसागर यांनी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहरअभियंता नेत्रदीप सरनोबत, अभियंता संदीप गुरव यांच्यासह मैदानाला भेट देवून पाहणी केली. तसेच योग्य त्या सूचना केल्या.
क्षीरसागर म्हणाले, गांधी मैदानात सांडपाणी साचण्याचे मूळ कारण शोधून त्यावर तात्पुरती मलमपट्टी करू नका. साचणारे सांडपाणी विनाअडथळा दुधाळी एस.टी.पी प्लांट पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा प्रथम अभ्यास करावा. सांडपाणी निचरा होण्याची क्षमता तपासून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठीच स्वतंत्र ड्रेनेज लाईन निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात यावा. याकरिता पुन्हा बैठक घेवून आराखड्याचे सादरीकरण करावे. अतिरिक्त निधी लागल्यास त्यासाठी पाठपुरावा करू पण गांधी मैदानात साचणारे पाणी कायमस्वरूपी बंद होण्यासाठी अभ्यासपूर्वक काम करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, मंदार पाटील, सुरज साळोखे, शैलेश साळोखे, रुपेश इंगवले, कपिल सरनाईक, राज अर्जुनिकर, निलेश गायकवाड आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









