सोशल मीडियावर आगमनाचे स्टेटस आणि बरेच काही : ग्रामीण भागातही चौकाचौकात बॅनरबाजी : सारेजण आतापासूनच कामाला लागल्याचे चित्र
बेळगाव : गणराय ही बुद्धीची देवता आणि प्रथम पूजली जाणारी देवता म्हणून ओळखली जाते. गणरायांच्या आगमनाची तयारी आता जोमात सुरू आहे. त्यामुळे सर्वत्रच सध्या आगमनाची धूम आहे. विशेषकरून गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात आणि गणेशाच्या आगमनासाठी स्टेटस, इन्स्टाग्राम, फेसबूकवर धूम सुरू झाली आहे. त्यामुळे आता सर्वत्रच आगमनाचे बॅनर्सही झळकू लागले आहेत. गल्ली ते चौकाचौकातही बॅनर्स व सोशल मीडियावर आगमनाच्या तयारीचे चित्रीकरण होत आहे. गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरवासियांना वेध लागले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनाचे… सोशल मीडियावर गणेशाच्या आतुरतेचे मॅसेज टाकण्यास सुऊवात झाली आहे. फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर गणेशाच्या आगमनाबद्दलचे नानाविध मॅजेस टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आतापासूनच गणेशाच्या स्वागतासाठी सारेच गुंतल्याचे दिसून येत आहे.
प्रसारमाध्यमांवर जोरदार चर्चा
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वषी लवकर या’ असा निनाद आता शहर परिसरात ऐकू येऊ लागला आहे. विविध ठिकाणी गणरायांची गाणी ऐकावयास मिळू लागली आहेत. त्यामुळे यावेळी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणेश चतुर्थी साजरी करण्याचा निर्णय अनेक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे आतापासूनच सारे जण कामाला लागत आहेत. मुंबईच्या धर्तीवर बेळगाव येथेही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महत्त्वाचे म्हणजे प्रसारमाध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू आहे. मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात पाहावयास मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आतापासूनच आतुरता तुझ्या आगमनाची, गणपती बाप्पा मोरया यासह अनेकांच्या डीपीही बदलू लागल्या आहेत. घरात कोणती सजावट करायची, काय करायचे याबाबतचे स्टेटस सध्या दिसत आहेत. त्यामुळे आगमनाच्या तयारीबरोबरच सोशल मीडियावरही वेगवेगळ्या स्वरुपातील मूर्ती दिसत आहे.
उल्हासदायी वाट पाहणारे मेसेज
सोशल मीडियावर सध्या एकच धूम आणि व्रेझ सुरू आहे ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची. यावषी आपण गणपती मोठ्या आनंदात आणि उत्साहात आणण्याचे, तर काही पारंपरिक गणेशाच्या आगमनाची तयारी करत असल्याचे मॅसेज सध्या व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवर दिसू लागले आहेत. अभिनव आणि समाजहिताचे ठरतील, असे उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आपण धुमधडाक्मयात आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी आतुरलेलो आहोत, अशी उल्हासदायी वाट पाहणाऱ्यांनीही मेसेज सोशल मीडियावर टाकले आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आतापासूनच गणरायांच्या आगमनाची चाहूल लागली आहे. ग्रामीण भागातही चौकाचौकात बॅनर बसवून राजाच्या आगमनाची तयारी करत आहेत. त्याचे फोटो डीपी, फेसबूक, इन्स्टाग्रामवर अपलोड करत आहेत. ग्रामीण भागातही गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे.
व्यवसाय सांभाळून सराव
मागील काही दिवसांपासून बेळगावात ढोलताशांचा आवाज घुमू लागला आहे. रात्रीच्या वेळी आपापले व्यवसाय सांभाळून सराव सुरू आहेत. काही नवीन मंडळे स्थापन केलेले गणेशभक्त ढोलताशांचा आवाज घुमविण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. ग्रामीण भागातही ढोल, ताशांवर भर देण्यात आला आहे. दरम्यान, याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहे. एकूणच बाप्पांच्या आगमनाच्या तयारीची सर्व छायाचित्रे व चित्रीकरण सोशल मीडियावर फिरू लागली आहेत.
ऑनलाईन गणेशमूर्ती करून घेण्यावर भर
शहर परिसरात अनेक मूर्तिकारांनी आधुनिकतेची कास धरली आहे. ज्यांना आपल्या गणेशमूर्ती पाहिजेत तशा प्रकारचा फोटो ऑनलाईन दिल्यास त्या प्रकारची मूर्ती तयार करून देण्याचीही अनेक जण तयारी दर्शवित आहेत. बेळगाव शहर परिसरातील मूर्तिकारांनीही आता ऑनलाईन मागणीप्रमाणे मूर्ती बनवून देण्यावर भर दिला आहे.









