वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलगतगा, गौंडवाड, यमनापूर परिसरामध्ये बुधवारी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया च्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोना महामारी आटोक्मयात येत असल्यामुळे शासनाने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यास अनुमती दिल्यामुळे सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरामध्ये बुधवारी सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती आणायला सुरुवात करण्यात आली. सकाळपासून ते दुपारी तीन ते चारपर्यंत घरगुती गणेश मूर्ती आणून परिसरातील भक्तांनी घरोघरी गणेशमूर्तींचे विधिवत पूजन करून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात होत असल्याचे चित्र दिसून येत होते.
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड परिसरामध्ये अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. सायंकाळी सहानंतर ट्रक्टर, ट्रक, रिक्षा आदी वाहनातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती आणण्यात आल्या.









