बेळगाव प्रतिनिधी : गणरायाची मूर्ती मातीची असो अथवा पीओपीची परंतु त्या मागील भाविकांची श्रद्धा महlवाची असते. काहि हौशी गणेशभक्त सोन्या -चांदीच्या मूर्ती, आभुषणे घालून गणरायाची पूजा करतात. हौसेला मोल नसते, असे म्हंटले जाते. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तशी आभूषणे घातली जातात. त्यामुळे असे हौशी भक्त सराफी पेढ्यांवर बाप्पांच्या आगमणासाठी सोने – चांदीच्या वस्तु व आभूषणे खरेदी केली जात आहेत. काहि घरांमध्ये परंपरागत चांदीच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. १० ग्रॅम पासून २ किलो पर्यंत वजनाच्या श्री मूर्ती पेढ्यांवर उपलब्ध आहेत.१ हजार रूपयांपासून ते १ लाख २० हजार रूपयांपर्यंत वजनानुसार मूर्तींच्या किंमती आहेत. गणरायाच्या प्रतिष्ठापणेसाठी चांदीचा चौरंग विविध आकारांमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. ज्यांना चांदीच्या मूर्ती अथवा इतर मोठे साहित्य खरेदी करणे शक्य नाहि ते भाविक लहान आभूषणे खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव हि व्यापारी पेठ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने -चांदीच्या दागिण्यांची उलाढाल होते. कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, विजापूर, मुधोळ या भागातून साहित्य खरेदीसाठी बेळगावमध्ये ग्राहक दाखल होतात. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आल्यामुळे खरेदीची लगबग बाजारात दिसून येत आहे. बाप्पाच्या पुजेसाठी लागणारे आरतीचे तबक, निरंजन, पळी, पंचपात्र, कलश, श्रीफळ, धुपारती यासह विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी पेढ्यांवर उपलब्ध आहे.
गणरायाला आवडणारे मोदक १५०० रूपयांपासून ५००० रूपयांपर्यंत, दुर्वा १५०० ते ५००० केवडा १८०० ते ३५००, सुका मेव्याचे ताट २००० ते ३०००, केळी, फुल आणि हार १५०० ते २५००, दुर्वा १००० रूपये ते २००० रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या काळात सर्वाधिक मागणी असते ती जास्वंदीच्या फुलाला. घरगुती गणेश मूर्ती सोबत सार्वजनिक श्रीमूर्ती समोर विविध आकारातील चांदीची फुले ठेवली जातात. मंडळांकडून या चांदीच्या फुलांचा लिलाव केला जात असल्याने यांना सर्वाधिक मागणी असते. हि फुले ७०० रूपयांपासून २५०० रूपयांपयांपर्यंत विक्रीसाठी सुवर्ण पेढ्यांवर उपलब्ध आहेत.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन