गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषामुळे तालुक्मयात उत्साहाचे वातावरण : गणेशचतुर्थी दिवशीच वीजपुरवठा खंडित केल्याने गणेशभक्तांतून संतप्त प्रतिक्रिया

वार्ताहर /किणये
तालुक्मयात बुधवारी मोठय़ा जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणरायाच्या स्वागताची साऱयांनाच उत्सुकता लागून राहिली होती. बुधवारी सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती आणण्यास भक्तांनी सुरुवात केली. दुचाकी, टेम्पो, ट्रक्टर, कार आदी वाहनांमधून भक्त बाप्पाला आणताना दिसत होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामुळे संपूर्ण तालुक्मयात उत्साहाचे वातावरण दिसून आले.

सकाळी घरगुती मूर्ती आणण्यात आल्या. तर दुपारनंतर सायंकाळपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती सजवलेले ट्रक्टर व टेम्पो यामधून आणण्यात आल्या. यावेळी लेझीम, ढोल ताशा व पारंपारिक वाद्यांचा गजर झाला. गणरायाची स्वागत मिरवणूक सुरू असताना काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. पाऊस सुरू होता. तरीही, भक्तांमध्ये उत्साह कायम दिसून आला.बालचमू, तरुण, महिला यांनी नवनवीन वस्त्रे परिधान केली होती. डोक्मयावर भगव्या टोप्या काही जणांनी परिधान केल्या होत्या. तसेच फटाक्मयांची आतषबाजीही जोरात सुरू होती.
गणपती मूर्तींसाठी आकर्षक आरास
घरगुती गणपती मूर्ती घरासमोर आणल्यानंतर महिला गणरायाचे आरती ओवाळून स्वागत करीत होत्या. घरगुती गणपती मूर्तींसाठी साऱयांनीच आकर्षक आरास तयार केलेली आहे. सजावट केलेल्या आसनाच्या ठिकाणी गणपती बाप्पाची विधिवत पूजा-अर्चा करून प्रति÷ापना करण्यात आली. त्यानंतर मोदक, पुरणपोळी व नैवेद दाखवून आरती करण्यात
आली.
बहुतांश ठिकाणी हलते देखावे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीमूर्ती सायंकाळी उशिरापर्यंत मंडपामध्ये दाखल करण्यात आल्या. गेल्या दहा-बारा दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्य0ाढर्ते गणपती बाप्पाच्या मंडपाची सजावट करताना दिसत होते. गावागावांमध्ये आकर्षक व सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. काही गावांमध्ये हलते देखावे सादर करण्यात आले आहेत.
पर्यावरणाबद्दल संदेश देणारे तसेच भारतीय लष्करी जवान, पंढरीची वारी तसेच विविध देवदेवतांच्या जीवन चरित्रावर आधारित देखावे सादर करण्यात आले आहेत. येत्या एक दोन दिवसात हे देखावे भक्तांच्या दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या ठिकाणी रात्री आठनंतर महाआरतीला सुरुवात झाली. यावेळी गावातील भाविक आरतीला हजर होते. आरती झाल्यानंतर भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर बहुतांशी ठिकाणी रात्री जागर भजनाचे कार्यक्रम झाले.
अकरा दिवस मनोरंजन कार्यक्रम
गणेशोत्सवानिमित्त येणारे अकरा दिवस विविध आध्यात्मिक, मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रमही होणार आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले
आहे.
कडोली भागात ढोल-ताशांचा गजर

कडोली : कडोली, केदनूर, बंबरगा आदी भागात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्मयांच्या आतषबाजीत श्री गणरायाचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले. मात्र ऐन गणेशचतुर्थी दिवशी वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने गणेशभक्तांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. यावषी निर्बंधमुक्त वातावरणात श्री गणरायांचे आगमन होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने धुमधडाक्मयात श्री गणेशमूर्तीची स्थापना होताना दिसत होती. फटाक्मयांची आतषबाजी आणि ढोल-ताशांचा गजरात घरगुती आणि सार्वजनिक गणरायांचे आगमन झाले. कडोली, जाफरवाडी, केदनूर, बंबरगा, मण्णिकेरी, गुंजेनहट्टी, देवगिरी आदी गावातून घरगुती आणि सार्वजनिक श्री गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात
आले.
तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित
ऐन गणेश चतुर्थी दिवशी हेस्कॉमने कडोली गावचा तब्बल सहा तास वीजपुरवठा खंडित केल्याने गणेशभक्तांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
सकाळपासून दुपारपर्यंत वीजपुरवठा बंद असल्याने सार्वजनिक गणेश मंडपातून शांत शांत वातावरण पहावयास मिळत होते. ना साऊंड बॉक्स, ना स्पीकरचा आवाज ऐकू येत होता. शिवाय घरातून विद्युतरोषणाई बंद असल्याने उत्साही कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून येत होता.
येळ्ळूरमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात मूर्तीचे आगमन

सार्वजनिक श्री बाल गणेशोत्सव मंडळाचा डीजेला फाटा : गणेशाचे उत्साही स्वागत
येळ्ळूर परिसरात गणेशोत्सवाला मोठय़ा उत्साहाने प्रारंभ झाला आहे. बुधवारी घरगुती गणेशमूर्तींसह सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत भक्तांनी एकच जयघोष केला होता. सकाळपासूनच घरगुती गणपती आणायला सुरूवात झाली. यावेळी बालचमुसह सारेजण मोठय़ा उत्साहाने गणेशमूर्ती आणताना दिसत होते.
दिवसभर विविध भागांतून गणेशमूर्ती आणण्याचे काम सुरू होते. त्यानंतर भक्तीभावाने पूजा, अर्चा करण्यात येत होती. विविध वाहनांतून सवाद्य मूर्ती आणण्यात येत होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच इतक्मया मोठय़ा प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे साऱयांचाच आनंद व्दिगुणीत झाला होता.
शिस्तबद्धरित्या मिरवणूक
घरघुती मूर्तींची स्थापना केल्यानतंर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती आणण्यासाठी धावपळ सुरू होती. अनेक मंडळांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या मिरवणूक काढत मूर्तींची स्थापना केली आहे.
रात्री उशीरापर्यंत ही स्थापना सुरू होती. मंडपामध्ये मूर्ती स्थापन केल्यानतंर आरती म्हणून पूजा करण्यात येत होती. नेताजी गल्ली येथील सार्वजनिक श्री बाल गणेशोत्सव मंडळाने गेली 8 वर्षे डीजेला फाटा दिला आहे. टाळ आणि मृदंगाच्या गजरात त्यांनी यावषीही गणेशमूर्ती आणली आहे. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
गणपती गल्लीतील गणेश उत्सव मंडळाने नेहमी प्रमाणे अत्यंत शिस्तबद्धरित्या मूर्ती आणली. यावेळी भगवे फेटे परिधान केले होते. याचबरोबर चांगळेश्वरी गल्ली गणेशोत्सव मंडळ, मल्लिकार्जुन, तानाजी, प्रताप, पाटील, कलमेश्वर, विराट, सिध्देश्वर, सुभाष, रामदेव, सांबरेकर, लक्ष्मी, नेताजी, ब्रम्हलिंग गल्लीसह इतर ठिकाणी श्रीमूर्तींची स्थापना करण्यात आली.









