खानापुरातील दुर्गादौडीला सहाव्या दिवशीही अभूतपूर्व प्रतिसाद
खानापूर : खानापुरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गादौडमुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून गल्लोगल्लीतील युवक, युवती आणि लहान मुले दिवसेंदिवस दौडीत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दौडीच्या सहाव्या दिवशी दौडीत लक्षणीय सहभाग होता. आजची दौड ही पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या दुर्गा मंदिरात सांगता होती. त्यामुळे आजच्या दौडीत पोलिसांचा सहभाग होता. पोलीस उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी दौडीचा ध्वज घेऊन दौडीत संचलन केले. पोलीस आणि पीटीएसच्या अधिकाऱ्यांनी दौडीचे भव्य स्वागत करून सहभागी धारकऱ्यांना प्रसादाची सोय केली होती. शहरात सर्वत्र दौडमधील घोषणांनी आवाज घुमला. यामुळे सारे खानापूर शहर एकप्रकारे शिवमय बनले आहे. शुक्रवारी सहाव्या दिवशीच्या दौडची सुऊवात शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवरायांची पूजा नगरसेवक लक्ष्मण मादार आणि शिवा मयेकर यांच्या हस्ते करण्यात आली. दौडच्या स्वागतासाठी या दौडीच्या मार्गावरील सारे रस्ते रांगोळ्यानी सजवले होते. दौड दुर्गानगर येथे येताच दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. दौडीवर पुष्पवर्षाव करण्यात आला. यानंतर दौड पीटीएस येथून दुर्गा मंदिरात आल्यावर आरती होऊन दौडीची सांगता झाली. सहरातील या संपूर्ण गल्लीत दौड फिऊन मंदिराजवळ आली. त्या ठिकाणी आरती व प्रेरणा मंत्र होऊन सहाव्या दिवसाच्या दौडची सांगता झाली.
दौडीचा उद्याचा मार्ग
रविवार दि. 22 रोजी शिवस्मारक, स्टेशनरोड, चिरमुरकर गल्ली, बेंद्रे खुट्ट, बाजारपेठ, पारिश्वाड क्रॉस, हायवे हत्तरगुंजी रोड, कलमेश्वर कॉलनी रोड, आयोध्यानगर रोड, फुलेवाडी, मुडेवाडी, श्री चव्हाटा मंदिर, हत्तरगुंजी समाप्ती.









