सावंतवाडी / प्रतिनिधी
ॲड.अनिल निरवडेकर यांनी गाळेधारकांना मिळवून दिला न्याय.
Gale holders got justice by Sawantwadi Court!
सावंतवाडी एस . पी . के कॉलेज नजिक गाळेधारकांना महावितरण विभागामार्फत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते.सदर आदेशाविरुद्ध गाळेधारकांनी ॲड. अनिल निरवडेकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली होती, त्या संबंधित सावंवाडी न्यायालयाने महावितरण विभागाच्या आदेशावर अंतरिम मनाई आदेश पारित करून सदर प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही गाळेधरकाचे वीज कनेक्शन खंडित करू नये असा आदेश दिला.सावंतवाडी न्यायालया मार्फत गाळेधारकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व गाळेधारकांनी ॲड. निरवडेकर यांचे अभिनंदन करून आभार मानले.









