क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एसपीएम रोड येथील गजाननराव भातकांडे स्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद भातकांडे होते.
संभाजी उद्यान महाद्वार रोड येथे आयोजित केलेल्या या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या सचिव मधुरा भातकांडे, मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर आदी उपस्थित होत्या. प्रारंभी शाळेच्या चारही हाऊसने पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. पार्थ नंद्याळकर, श्रेया कौजलगी, अनुज जाधव, संतोष चौधरी, स्वयम चतूर, दीया मालवणकर, सर्वेश मन्नोळकर व श्रेया देवकी या क्रीडापटूंनी क्रीडाज्योत पाहुण्यांकडे सुपूर्द केली. नुपूर संताजीने सर्व खेळाडूंना शपथ दिली. यावेळी सर्व शाळेचे शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वप्नील वाके, मोहन राजपूत, क्रीडा शिक्षक मॅथ्यू लोबो यांनी विशेष परिश्रम घेतले.









