प्रतिनिधी,रत्नागिरी
जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी सभापती तथा संचालक गजानन कमलाकर पाटील तथा आबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.सहकार पॅनेलच्या माध्यमातून गजानन पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मोजक्या जागेसाठी असलेल्या या निवडणुकीत यावर्षी अनेकांनी अर्ज सादर केल्याने चुरस वाढली होती. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले. गजानन पाटील यांनी इतर मागास वर्ग या मतदारसंघातून फॉर्म भरल्यानंतर त्यांच्यासमोर तब्बल चार उमेदवारांनी आपापले अर्ज सादर करत आव्हान उभे केले होते. मात्र विरोधातील चारही उमेदवारांना अर्ज मागे घेतले. त्यामुळे गजानन पाटील यांची निवड निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
Previous Articleअर्चना घारे यांनी घेतली व्हिक्टर डान्टस यांची भेट !
Next Article अलतगे श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सव आजपासून









