सावंतवाडी | प्रतिनिधी
आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गजानन नाटेकर हे शिवसेना पक्ष सोडण्याच्या मार्गावरआहेत. स्वीय सहाय्यक पदावरून मुक्त करावे या दृष्टीने ते विचार करत आहेत. आमदार दीपक केसरकर सावंतवाडीत आल्यानंतर नाटेकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. श्री नाटेकर हे गेली तीस वर्षाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेनेला सोडचिट्टी देणार का असा प्रश्न व्यक्त केला जात आहे.









