तैलरंगामध्ये रेखाटली छत्रपती शिवराय-रामदास स्वामी यांची हुबेहुब प्रतिमा
वार्ताहर /किणये
छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती शिवप्रेमी वेगवेगळय़ा पद्धतीने करतात. शिवरायांबद्दल सर्वांच्या मनात आदराचे स्थान आहे. तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आहेत.
मंडोळी, सावगाव, मण्णूर आदी गावांमध्ये शिवरायांची नियमित पूजा करण्यात येते. निलजी गावचे चित्रकार गजानन लोहार यांनी छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांची अप्रतिम कलाकृती रेखाटली आहे.
शिवराय व रामदास स्वामी यांचे तैलरंगामध्ये 15ƒ12 फूट आकाराचे सुंदर असे हुबेहुब चित्र गजानन लोहार यांनी रेखाटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते व वन टच फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी ही शिवरायांची कलाकृती घेतली असून त्यांनी आपल्या घरात ही शिवरायांची प्रतिमा लावली आहे.
माजी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर भातकांडे, गजानन गोडसे, महेश बामणे, ज्योतेश हासडे, मनोहर बुक्याळकर, नारायण कांगले, पुंडलिक अक्षीमणी, नारायण कणबरकर, सुनील आनंदाचे आदींच्या हस्ते या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.
शिवप्रेमींकडून समाधान
यावेळी जुना गुड्सशेड रोड येथील नागरिक व शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रेमी विठ्ठल पाटील यांच्या घरी येऊन ही प्रतिकृती पाहून समाधान व्यक्त करत आहेत.









