राजस्थानच्या मेवात येथे अटक
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या मेवात येथील सरफराज नावाच्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरफराजने व्हॉटसऍपद्वारे धमकीचा संदेश पाठविला होता. याचबरोबर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. लखनौमध्ये राहणारे देवेंद्र तिवारी यांच्या घरी एका बॅगेत धमकीचे पत्र मिळाले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.









