हरियाणात कारवाई : देवबंद येथे घडलेल्या घटनेत आझाद जखमी
वृत्तसंस्था/ चंदीगड
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला करणाऱ्या तऊणांना पोलिसांनी अटक केली आहे. हरियाणातील अंबाला येथून पोलिसांनी चार तऊणांना अटक केली आहे. लविश, आकाश आणि पोपट अशी तिघांची नावे असून हे तऊण रणखंडी गावातील रहिवासी आहेत. दुसरीकडे, एक तऊण हरियाणातील कर्नाल येथील गोंदर गावचा रहिवासी आहे. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
भीम आर्मीचे संस्थापक आणि आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील देवबंदमध्ये गोळीबार झाला होता. गोळीबारात जखमी झाल्याने चंद्रशेखर यांना उपचारासाठी त्वरित शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासोबतच पोलिसांनी मिरगपूर गावातून खुनी हल्ल्यात वापरलेली कार जप्त केली होती. पोलिसांनी जप्त केलेल्या कारचा नोंदणी क्रमांक एचआर 70 डी 0278 असा आहे.









