मुंबई
गेल इंडिया कंपनीचे समभाग शेअरबाजारात शुक्रवारी तेजीत असताना दिसले. सदरचे कंपनीचे समभाग हे 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचले आहेत. कंपनीचा समभाग शुक्रवारी बीएसईवर सुमारे 5 टक्के वाढत 103 रुपयांवर इंट्रा डे दरम्यान पोहचला आहे. गॅसशी संबंधीत कंपनीच्या समभागाने यापूर्वी 19 एप्रिल 2022 मध्ये 116 रुपयांपर्यंत उच्चांकी मजल मारली होते. गॅस पुरवठय़ासह एलपीजी, एलएलएच आणि पेट्रोकेमिकल्सच्या व्यवसायात कंपनी कार्यरत आहे.









