नवी दिल्ली :
सीबीआयने गेलचे कार्यकारी संचालक के.बी. सिंह यांच्यासमवेत 5 जणांना अटक केली आहे. 50 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई कली आहे. सीबीआयकडून याप्रकरणी नोएडा, दिल्ली, विशाखापट्टणम येथे छापे टाकण्यात आले आहेत. वडोदरा येथील अॅडव्हान्स इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक सुरेंद्र कुमार यांनाही सीबीआयने अटक केली आहे. दोन गॅस पाइपलाइन प्रकल्पांसाठी लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.









