वृत्तसंस्था / मुंबई
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या इंडिया अ संघाच्या कर्णधारपदी महाराष्ट्र रणजी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडकडे कप्तानपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अभिमन्यू ईश्वरन उपकर्णधार म्हणून राहील.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या इंडिया अ संघामध्ये इशान किशन आणि अभिषेक पोरेल हे दोन यष्टीरक्षक आहेत. या दौऱ्यासाठी इंडिया अ संघामध्ये मुकेशकुमार, खलील अहमद, यश दयाल आणि नवदीप सैनी या चार वेगवान गोलंदाजांचा तर मानव सुतार आणि तनुष कोटीयान या दोन फिरकी गोलंदाजांचा समावेश केला आहे. इंडिया अ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रथमश्ा़dरेणीचे दोन सामने खेळविले जाणार आहेत.
उभय संघातील हे दोन सामने मॅके आणि मेलबर्न येथे आयोजित केले आहेत. त्यानंतर इंडिया अ संघ पर्थ येथे होणाऱ्या तीन दिवसांच्या सामन्यात सहभागी होईल. या दौऱ्यातील पहिला सामना 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, दुसरा सामना 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळविला जाईल. 15 नोव्हेंबरला इंडिया अ संघाचा सामना भारताच्या वरिष्ठ संघाबरोबर होईल.
इंडिया अ संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नितीशकुमार रे•ाr, देवदत्त पडिकल, रिकी भुई, बाबा इंद्रजित, इशान किशन, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार, खलील अहमद, यश दयाल, नवदीप सैनी, मानव सुतार, तनुष कोटीयान









