एका डॉक्टरची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याची बदली सिंधुदुर्गला केली आहे
कोल्हापूर : आरोग्य विभागाने कर्तव्यात कसूर केलेल्या तीन डॉक्टर, एक औषध निर्माता, दोन लॅब टेक्निशीयन व एक लिपीक यांना कारणे दाखवा नोटीस तर दोन अधिपरिचारिकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका डॉक्टरची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याची बदली सिंधुदुर्गला केली आहे.
या कारवईने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. यांच्या चौकशी अहवालानुसार करण्यात आली आहे. ‘बोजवारा आरोग्य सेवेचा’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत संवाद’ने कोल्हापूर जिह्यातील आरोग्य यंत्रणा आणि मिळणाऱ्या सुविधांचा गोषवाराच मांडला होता.
‘तरुण भारत संवाद’ने या घटनेला वाचा फोडल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली.
गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबद्दल सखोल आरोग्य विभागाने कर्तव्यात कसूर केलेल्या तीन डॉक्टर, एक औषध निर्माता, दोन लॅब टेक्निशीयन व एक लिपीक यांना कारणे दाखवा नोटीस तर दोन अधिपरिचारिकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका डॉक्टरची प्रतिनियुक्ती रद्द करून त्याची बदली सिंधुदुर्गला केली आहे.
या कारवईने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. यांच्या चौकशी अहवालानुसार करण्यात आली आहे. ‘बोजवारा आरोग्य सेवेचा’ या मथळ्याखाली ‘तरुण भारत संवाद’ने कोल्हापूर जिह्यातील आरोग्य यंत्रणा आणि मिळणाऱ्या सुविधांचा गोषवाराच मांडला होता.
‘तरुण भारत संवाद’ने या घटनेला वाचा फोडल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. या प्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबद्दल सखोल अधिपरिचारिका करिश्मा हाबळ
व सुषमा सूर्यवंशी यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्याची शिफारस केली होती.
इतर तालुक्यातही लक्ष देण्याची गरज
गर्भवती महिला कल्पना डुकरे यांच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर तऊण भारत संवादने संपूर्ण जिह्यतील आरोग्य यंत्रणेतील फोलपणा उघड केला होता. या वृत्ताची दखल घेऊन गगनबावडा तालुक्यातील आरोग्य विभागात सुधारणा कऊन दोषींवर कारवाई केली. जिह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील आरोग्य केंद्रातील स्थिती दयनीय आहे.
काही ठिकाणी तज्ञ डॉक्टरच नाहीत, तर जिथे आहेत तिथे ते उपलब्ध नसतात. काही ठिकाणी वैद्यकीय साहित्याची वानवा आहे. तर जिथे साहित्य आहे तिथे ते चालवण्यासाठी तज्ञ नाहीत, अशी अवस्था आहे. कोल्हापूर जिह्यातील इतर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्ष द्यावे, अशी आग्रही मागणी होत आहे.
गंभीर बाबी निदर्शनास आल्याने कारवाई
“गगनबावडा ग्रामीण रुग्णालय येथे घडल्या प्रकाराची गंभीर दखल आरोग्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यांच्या आदेशाने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालानुसार काही गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील कामचुकार लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.”
– डॉ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर विभाग








