जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व अजय क्लासिक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गगन मुतगी, तमय पावले, पृथ्वी जी., अथनीश ताशिलदार, अर्जुन पाटील यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले. बसवाण गल्ली श्रीधर स्वामीमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून जवळपास 75 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा बीडीसीएच्या मान्यतेनुसार घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून स्पर्धेला चालना देण्यात आली.
खुला गट : 1) गगन मुतगी, 2) आर्यमन निगम, 3) आदित्य देसाई, 4) किनन पोरवाल, 5) हर्ष कुलकर्णी यांनी विजेतेपद पटकाविले. पहिले ते चौथी गटात 1) तमय पावले, 2) दिव्यांश तालिमनी, 3) हर्षवर्धन जाधव, 4) समंथ पाटील, 5) स्वरा देसाई. पाचवी ते सातवी गट 1) पृथ्वी जी, 2) अहदीया सय्यद, 3) दानवी पाटील, 4) कानवा, 5) उर्वा सय्यद. 8 ते 10 वी गट 1) अथनीश ताशिलार, 2) अनिरूध्द पाटील, 3) विवेक के., 4) पार्थ बी., 5) स्वरीत दुगाई. पाच वर्षाखालील गटात अर्जुन, चेतन पाटीलने विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीडीसीएचे अध्यक्ष निलेश भंडारी, आनंद कुलकर्णी, रेश्मा कुलकर्णी, आदित्य शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.









