पत्रकार परिषदेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये दि. 24 रोजी पणजी येथे झालेल्या बैठकीत राज्याशी संबंधित असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवारी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यात 10 हजार कोटींची राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील 15 कामे प्रलंबित आहेत. विविध कारणांनी ही कामे विलंब झाली आहेत. आतापयर्तिं 2 हजार कोटींची कामे झाली आहेत. मात्र, विविध कारणांनी ही कामे प्रलंबित राहिली आहेत. वनखात्याकडून परवानगी न मिळणे, जमीन संपादन प्रकरण न्यायालयात जाणे, अशा विविध कारणांनी कामांना विलंब झाला आहे. गेल्या 12 वषर्पांसून लहान-सहान कारणांनी अनेक महामागर्चीं कामे स्थगित आहेत.
ही कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. याबाबत लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी हाती घेण्यात आलेली कामे विविध कारणांनी स्थगित झाली आहेत. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, वनखाते व इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ही कामे पूर्ण करणे शक्य होणार आहे. पणजी येथे झालेल्या बैठकीत वनखात्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विजापूर-हुबळी महामार्गाचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. 1 टक्का काम शिल्लक राहिले असून ते काम त्वरित पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव-गोवा रस्ता विकासासाठी 58 कोटी मंजूर
चोर्लाघाटद्वारे बेळगाव आणि गोवा संपर्क रस्त्याचा कर्नाटक हद्दीपयर्तिं विकास करण्यासाठी 58 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आठवडाभरात निविदा मागविण्यात येणार असून एप्रिल-2024 पयर्तिं काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, लक्ष्मणराव चिंगळे, आमदार नागराज यादव आदी उपस्थित होते.
हिजाबबंदी मागे घेण्याचा मुद्दा न्यायालयाला पटवून देऊ!
आपले सरकार सत्तेत आल्यानंतर हिजाबबंदी कायदा मागे घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आपण कायदा मागे घेऊ. निवडणूक वचननाम्यात त्याचा उल्लेख केला आहे. हा विषय न्यायालयात असून न्यायालयाला सरकारची बाजू पटवून देण्यात येईल, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबबंदी कायदा मागे घेणार असल्याचे सांगितले आहे. यावर पत्रकारांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. यापूर्वी हिजाबवर बंदी नव्हती. तत्कालिन सरकारने हिजाबवर बंदी आणली आहे. प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाला आपली बाजू पटवून देऊ, त्यानंतर न्यायालय निर्णय देईल, असे त्यांनी सांगितले. तर विरोधी पक्षाकडून ‘इंडिया’ आघाडीकडून खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. याला काही मित्रपक्षांनी समर्थन दिले आहे. याबाबत विचारले असता सतीश जारकीहोळी यांनी आतापयर्तिं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा नेता देणे शक्य झाले नव्हते. इंडिया आघाडीच्या सदस्यांनी खर्गे यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये याचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे आम्हीही या निर्णयाचे स्वागत करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अर्ज हायकमांडकडे पाठविणार
बेळगाव जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांची यादी येत्या आठवडाभरात हायकमांडला पाठविण्यात येणार आहे. बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर अर्ज हायकमांडला पाठवून देण्यात येतील. यासंबंधी विजापूर जिल्ह्यात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व अर्ज घेऊन एकत्रितपणे हायकमांडकडे पाठविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.









