वलांडी, ता.देवणी जि – लातूर येथील खाटीक समाजातील एका ७ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तसेच याबद्दल कोठेही वाच्यता केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या प्रकरणाचा गुन्हा लातूर पोलिसांत दाखल झाला आहे. आज गडहिंग्लज मधील खाटीक समाजाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवदेन गडहिंग्लज प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार जीवन क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आले आहे. या निवेदनात असे म्हंटले आहे कि, लातूर जिल्ह्यात घडलेली हि घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.या घटनेतील पीडित बालिकेचे वडील वारलेले असून आई मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिच्या घरासमोर राहणाऱ्या एका नराधमाने पीडित बालिकेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तसेच या नराधमाने बालिकेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या कुटुंबियास शासनाने पोलीस संरक्षण द्यावे,तसेच ही मुलगी अनुसूचित जाती तील असल्याने या नराधमावर ॲट्रोसिटी दाखल करावी. व नराधमावर परिपूर्ण कायदेशीर कलमे लावून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणाऱ्या निवेदनाची प्रत गृहमंत्री,सामाजिक न्यायमंत्री, महिला बालकल्याण मंत्री, जिल्हाधिकरी कोल्हापूर,लातूर, सहाय्यक आयुक्त,जिल्हा बाल कल्याण समिती इत्यादींना पाठविण्यात आली आहे. तसेच यावेळी गडहिंग्लज मधील खाटीक समाज बांधव मोठ्या संख्येने प्रांत कार्यालयात उपस्थित होते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









