वृत्तसंस्था /गुडालजेरा
डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या गुडालजेरा खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षीय ऑलिव्हीया गॅडेस्किने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना ट्रिव्हेसनचा पराभव केला.
ऑस्ट्रेलियाच्या गॅडेस्कीने पहिल्यांदाच डब्ल्युटीए टूरवरील स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने ट्रिव्हेसनचा 6-2, 3-6, 6-1 असा पराभव केला. आता गॅडेस्कीचा उपांत्य फेरीचा सामना कॅमिला ओसोरीओशी होणार आहे. ओसोरीओने रेखीमोव्हाचा 7-6(8-6), 6-1 असा पराभव केला. या स्पर्धेत गार्शिया आणि फ्रेच यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होईल. फ्रेचने स्टेकुसिकचा 6-4, 6-3 असा पराभव केला. ग्रासियाला बोझकोव्हाकडून पुढे चाल मिळाली.









