वृत्तसंस्था/ डोहा
शुक्रवारी येथे झालेल्या डायमंड लीग ऍथलेटिक्स हंगामातील सलामीच्या स्पर्धेत अमेरिकेचे धावपटू गॅबी थॉमस आणि नोहा लिलेस यांनी अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत विजेतेपद पटकाविले.
डायमंड लीग ऍथलेटिक्स सिरीज हंगामातील ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले आहे. येत्या जुलैमध्ये अमेरिकेतील युगेनी येथे होणाऱया विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी ही डायमंड लीग सिरीज ऍथलेटिक्स स्पर्धा ऍथलिट्सच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाते. महिलांच्या 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत अमेरिकेच्या लिलेसने 19.72 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान पटकाविले. जॅक्सनला या क्रीडाप्रकारात दुसरे तर ब्रिटनच्या डायना स्मिथला तिसरे स्थान मिळाले.









