ञ्भुवनेश्वर ओडिशा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कलाउत्सवात गोव्याचे केले प्रतिनिधित्व करीत पटकावला प्रथम क्रमांक
प्रतिनिधी /म्हापसा
कला उत्सव हा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत शिक्षण मंत्रालयाचा (श्द)िं उपक्रम आहे, जो देशातील माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रतिभेचे पालनपोषण करून आणि त्यांचे प्रदर्शन करून शिक्षणात कलांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (Rश्एA) माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सौंदर्यशास्त्र आणि कलात्मक अनुभवांचे महत्त्व ओळखते, जे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि त्याच्या दोलायमान विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात प्रमुख भूमिका बजावतात.
म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर या शाळेची गुणवंत विद्यार्थिनी कुमारी. साईशा दिवकर हिने भुवनेश्वर ओडिशा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कला उत्सवात रेखाचित्र आणि चित्रकलेत देशात अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिने या स्पर्धेसाठी म्हापसा येथील प्रसिद्ध श्री. देव बोडगेश्वर मंदिराचे व भाविकांचे चित्र रेखाटन केले होते. तिला शाळेचे कला शिक्षक अजय कोठावळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेसाठी सर्व राज्यातून व केंद्रशासित प्रदेशातून विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तिच्या ह्या यशामुळे तिने शाळेचे, म्हापशाचेच नव्हे तर संपूर्ण गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. साईशा शाळेची एक हुशार, शांत, प्रामाणिक, सर्जनशील अशी विद्यार्थिनी. शाळा, तालुका तसेच राज्यपातळीवर तिने चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. कला उत्सव 2022-23 साठी जी. एस. आमोणकर शाळेचे सात विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले गेले आणि सातही विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली.
स्पर्धा आणि विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे:
- गायन संगीत: आशय गाडगीळ आणि आर्या मणेरीकर – तृतीय क्रमांक
- वाद्य संगीत: स्वरेश परब – द्वितीय क्रमांक
- स्वदेशी खेळणी बनविणे: क्षितिज शिंदे आणि सोनिका नाईक – तृतीय क्रमांक
- रेखाचित्र आणि चित्रकला: साईशा दिवकर – प्रथम क्रमांक साईश नाईक – तृतीय क्रमांक.
या सर्व विद्यार्थ्यांमधून साइशा दिवकर हिला गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली व या संधीचे तिने प्रथम क्रमांक पटकावून सोनं केलं. तिच्या या यशाबद्दल शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राज आमोणकर, शाळेचे अध्यक्ष ?ड. संजय उसगावकर, मुख्याध्यापिका गायत्री शिरसाट, उपमुख्याध्यापिका पूजा दळवी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी तिचे व तिचे मार्गदर्शक अजय कोठावळे यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.









