माजी आमदार विनोद कुमार चौधरी यांचे निधन
► वृत्तसंस्था/ पाटणा
‘द प्लुरल्स पार्टी’च्या प्रमुख पुष्पम प्रिया चौधरी यांचे वडील आणि जेडीयूचे माजी विधान परिषद आमदार विनोदकुमार चौधरी यांचे रविवारी बिहारमधील बलभद्रपूर, लाहेरियासराय येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बिहारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.
2020 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वत:ला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची उमेदवार म्हणून घोषित केल्यावर माजी आमदार विनोदकुमार चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी प्रकाशझोतात आली होती. निवडणूक काळात पुष्पम प्रिया यांनी बिहारमध्ये फिरून प्रचार केला होता. विशेष म्हणजे, त्यावेळी पुष्पम प्रियाचे वडील जेडीयूमध्ये होते आणि ते नितीशकुमार यांच्या जवळचे मानले जात होते. विनोदकुमार चौधरी यांचे धाकटे बंधू प्रा. विनय कुमार चौधरी हे बेनीपूरचे आमदार आणि जेडीयूचे राज्य प्रवक्ते आहेत.