सहभागी होण्यास चीनचा नकार : भारताचे रोखठोक प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 पर्यटन कार्यगटाची तिसरी बैठक 22 ते 24 मे दरम्यान जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये होत आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या विकासात पर्यटन उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र दहशतवादी घटनांमुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला. पण कलम 370 हटवल्यानंतर त्यात बरीच सुधारणा झाली आहे. जी-20 बैठक जगभरातील गुंतवणूकदार आणि पर्यटकांना आकर्षित करू शकते, असा विश्वास काश्मीरमधील पर्यटनाशी संबंधित तज्ञांना आहे.
काश्मीरमधील जी-20 बैठकीत सहभागी होण्यास चीनने नकार दिला आहे. विवादित भूभागावर कोणत्याही प्रकारच्या जी-20 बैठकीला आपला ठाम विरोध असल्याचे मत चीनने व्यक्त केले आहे. चीनच्या या वक्तव्यावर भारताने आक्षेप घेत ‘आमच्या हद्दीत बैठका घेण्यास आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहोत’, असे रोखठोक प्रत्युत्तर भारताने दिले आहे. यापूर्वी मार्चमध्ये अऊणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठक झाली होती. त्यानंतरही चीन या बैठकीत सहभागी झाला नव्हता. त्यानंतर पाकिस्तानने चीनच्या या बहिष्काराचे समर्थन केले होते. काश्मीरमधील जी-20 बैठकीच्या निषेधार्थ चीन आणि पाकिस्तान प्रत्येक वेळी एकत्र उभे असल्याचे दिसून आले. या महिन्याच्या सुऊवातीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करताना प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या काश्मीर वादाचा मुद्दा उपस्थित केला होता.









