श्रीनगरमध्ये 22-23 मे रोजी आयोजन : चीन-पाकिस्तानकडून आक्षेप
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जी-20 ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. जी-20 नियोजन समितीच्या नियोजनानुसार श्रीनगरमध्ये 22 आणि 23 मे रोजी पर्यटनावरील कार्यगटाची बैठक होणार आहे. पहिल्यांदाच जी-20 ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहे. तसेच कलम 370 हटवल्यानंतर येथे पहिली आंतरराष्ट्रीय शिखर परिषदही होणार आहे.
जी-20 च्या युवा-20 आणि नागरी-20 बैठकांसाठी निवडलेल्या देशातील 15 संस्थांमध्ये काश्मीर विद्यापीठाचा समावेश आहे. जी-20 च्या कार्यगटाची बैठक यापूर्वीच काश्मीर विद्यापीठात झाली आहे. या बैठकीत लैंगिक समानता आणि अपंगत्व या दोन मुद्यांवर चर्चा झाली होती. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने काश्मीर विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार केला असून काश्मीर विद्यापीठ युथ-20 शिखर परिषदेपूर्वी कार्यक्रमांचे आयोजन देखील करेल. यामध्ये जी-20 देशांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. जून 2023 मध्ये वाराणसी येथे युथ-20 समिट होणार आहे.
चीन-पाकिस्तानचा सातत्याने विरोध
जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 बैठक घेण्यास चीन आणि पाकिस्तान सातत्याने विरोध करत आहेत. जी-20 मध्ये सहभागी देशांना मदत करून पाकिस्तान या बैठकीला विरोध करत होता. जी-20 बैठक जम्मू-काश्मीरमध्ये होऊ नये, असे चीनने मार्चमध्येच म्हटले होते. आता ही बैठक श्रीनगरमध्ये पार पडल्यानंतर चीन त्यापासून दूर राहू शकतो, असे मानले जात आहे. जी-20 शी संबंधित बैठका देशातील 28 राज्यांमध्ये आयोजित केल्या जातील, असे जी-20 चे अध्यक्षपद भूषविणाऱ्या भारताने सुऊवातीलाच सांगितले आहे. याअंतर्गत अऊणाचल आणि काश्मीरमध्येही या बैठकांचे नियोजन झाले आहे. अऊणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जी-20 बैठकीपासूनही चीन दूर राहिला. चीन अऊणाचलला भारताचा भाग मानत नसल्यामुळे चीनने अऊणाचलमधील बैठकीला हजेरी लावली नव्हती.









