नवी दिल्ली
दिल्लीची हवा दिवसेंदिवस अधिकच विषारी होत आहे. शुक्रवारी दिल्ली एअर क्वालिटी इंडेक्स गंभीर श्रेणीत पोहोचला. गुरूवारी सकाळी शहरात 351 एक्युआयची नोंद झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी एक्युआय 450 वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीतील वायू प्रदुषणामुळे लोक हैराण झाले आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे सरकारकडून बांधकाम आणि वाहन वापरावर निर्बंध लागू केले आहेत. तसेच प्राथमिक शाळांनाही दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या प्रदुषणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही जोरात सुरू झाल्या आहेत. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली आहे.









