प्रतिनिधी/ बेळगाव
दसरा, दिवाळीचे औचित्य साधून बेळगावकरांचे मनोरंजन करण्यासाठी फनफेअर महोत्सव सुरू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सदाशिवनगर येथील गाणिग समाज संघाच्या मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन आमदार असिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले.
या महोत्सवात जायंट व्हील, तोरा तोरा, वॉटर बोटींग, मुलांसाठी कीड्स ट्रेन, ड्रॅगन ट्रेन आदी अनेक खेळांचा समावेश आहे, जे लहान मुलांचे आकर्षण ठरणार आहे. याबरोबरच प्रथमच फिश टँक आणि फिश अॅक्वेरियम आहे. अशा प्रकारचे मत्स्यालय सिंगापूर आणि मलेशियामध्ये असून आता बेळगावमध्ये ते पाहायला मिळणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थांचे असंख्य स्टॉल्स येथे आहेत.
उद्घाटनप्रसंगी आमदार असिफ सेठ यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या व बेळगावकरांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आयोजक चंद्रण्णा, कुशलनगर, शिवकुमार मुदगेरे, महांतेश हावली, एस. के. पाटील आदी उपस्थित होते. बेळगावकरांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.









