मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
बेळगाव : भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष राजीव दोड्डाणवर (वय 68) यांचे गुरुवार दि. 2 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचे पार्थिव भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध मान्यवरांनी राजीव दो•ण्णावर यांना आदरांजली वाहिली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार अनिल बेनके, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, वीरकुमार पाटील, अरुण शहापूर, माजी आमदार ए. बी. पाटील, संजय पाटील, कल्लाप्पाण्णा मॅगेनवर, जमीर अहमद, विजय मोरे, सुनील हणमन्नवर, हुबळी जैन समाजाचे नेते महेंद्र सिंघवी, अनिल बाफना, अथणी जैन समाजाचे नेते अरुण यलगुद्री यांच्यासह हुबळी, धारवाड, हावेरी, होस्पेट, बेळ्ळारी, हुक्केरी, कसमळगी, विविध गावातील नेते, माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंग, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो, भारतीय जैन संघटना, जैन युवा संघटनेचे पदाधिकारी, मंदिर विश्वस्त व अनेक मान्यवर उपस्थित होते. राजीव दो•ण्णावर यांच्या अकाली निधनाबद्दल विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय व्यक्ती, माजी नगरसेवक यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी दुपारी 3 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.









