वेंगुर्ले (वार्ताहर)-
माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची मागणी
5 crores for development at Vengurle Nishan Lake – Demand to Palak Minister
वेंगुर्ला नगरपरिषदेकरिता अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत विकसीत करणे (सोलार प्रकल्प) आणि निशाण तलावाचा भाग पर्यटनदृष्टया विकसीत करणेसाठी ५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करुन मिळण्याची मागणी वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना माजी गनराध्यक्ष दिलीप गिरप त्यांनी सादर केलेल्या लेखी निवेदनांत, वेंगुर्ला नगरपरिषद ही क वर्ग नगरपरिषद असून उत्पन्न अत्यल्प आहे. नगरपरिषदेने शहरातील विविध विकास कामे योग्य दर्जाची केलेली आहे. यामध्ये ‘सुसज्ज असे मच्छीमार्केट, भाजीमार्केट, इतर इमारती तसेच चार गार्डन आणि मल्टीपर्पज हॉल बांघलेला आहे. यासाठी नगरपरिषदेला – अतिरिक्त विजेचा वापर होत आहे. यामुळे विज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ज्याची देयके नगरपरिषदेस स्वः निधीतून भरावी लागत आहेत. तसेच सध्या नगरपरिषदेस अजूनही कांही महत्वाची कामे शासनाकडून वेगवेगळ्या निधीतून मंजूर होत आहेत. ज्यामुळे विजेच्या वापरात आणि देयकामध्ये मोठया प्रमाणात वाढ होणारी आहे. परंतु या गोष्टी केल्यामुळे वेंगुर्ला शहरातील पर्यटन वाढीसाठी चालना मिळणारी आहे. यावर उपाय म्हणून नगरपरिषद मालकीच्या निशाण तलावांच्या भिंतीवर सोलार प्रकल्प करून विजेमध्ये स्वयंपूर्ण होणे हा एकच पर्याय आहे. यापूर्वी नगरपरिषदेने कांही प्रमाणात सोलार प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. ज्यामुळे विद्युत देयकामध्ये बचत होत आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे मालकीचे निशाण तलाव असून त्याची उंची वाढविणेचे काम आताच पूर्ण झालेले आहे. त्यामुळे सदरचा भाग पर्यटनदृष्टया विकसीत केल्यास मोठया प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येवू शकणार आहेत. यामध्ये कारंजा बांधणे, पर्यटकांची बसण्याची सोय करणे, वेगवेगळे गजियो तयार करणे, विद्युत रोषणाई करणे वगैरे बाबी केल्यास पर्यटन वाढीसाठी चालना मिळू शकणारी आहे.या सर्वाचा विचार करता आम जनतेकडून नगराध्यक्ष म्हणून मला गेल्या ५ वर्षासाठी दिलेल्या प्रेरणेमुळे आज जरी त्या पदावर नसलो तरी माजी नगराध्यक्ष या नात्याने वेंगुर्लेच्या विकासासाठी कटीबध्द आहे. त्यामुळे आपणांस विनंती करत आहे की, वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ले नगरपरिषदेकरिता अपारंपारिक उर्जा स्त्रोत विकसीत करणे (सोलार प्रकल्प) आणि निशाण तलावाचा भाग पर्यटनदृष्ट्या विकसीत करणेसाठी उपलब्ध निधीतून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली आहे.सदरचे निवेदन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना सादर करताना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचे समवेत माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, नागेश उर्फ पिंटू गावडे. धर्मराज कांबळी, माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर, कृपा गिरप-मोंडकर, श्रेया मयेकर, पुनम जाधव यांचा समावेश होता.