प्रतिनिधी,कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील भुदरगड तालुक्यातील रस्ते विकास व पुल बांधणीसाठी नाबार्ड-28 अंतर्गत 3 कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे, मंजूर झालेल्या कामांमध्ये भुदरगड तालुक्यातील कुर-कोनवडे-निळपण-दारवाड-म्हसवे-म्हालवाडी-आकुर्डे रस्ता प्रजिमा 48 किमी 5/600 ते 7/00 मध्ये रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी 2 कोटी व गारगोडी-पुष्पनगर-मडूर-शेळोली-वेंगरुळ-वेसर्डे-पाळ्याचा हुडा ते पाटगांव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 52 किमी 12/00 मध्ये पुल बांधण्यासाठी 1 कोटी असा एकूण 3 कोटी रुपयांचा निधी नाबार्ड 28 अंतर्गत मंजूर झाला आहे. सदरची कामे मंजूर झाल्याने परिसरातील जनतेची दळण-वळणाची चांगली सोय होणार आहे.
निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण व कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले असल्याचे खासदार मंडलिक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









