काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, अभियंत्यांसह मान्यवरांनी केली जागेची पाहणी
वार्ताहर /उचगाव
उचगाव येथील मराठा समाज भवनसाठी दोन कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या जागेची पाहणी करण्यासाठी मंगळवारी ग्रामीण भागाच्या आमदार व महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव व युवा नेते मृणाल हेब्बाळकर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी येऊन उचगाव येथील जागेची पाहणी केली. व उचगाव नागेशनगर येथील नेम्मदी केंद्राच्या बाजूला असलेल्या जागेवरती मराठा समाजभवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या जागेचे मोजमाप करून इंजिनिअरला त्या जागेचा नकाशा काढण्यासाठी सांगण्यात आले. उचगाव येथे लोकांच्या सर्व सोयीसाठी प्रशस्त असे मराठा भवन बांधण्याचा निर्णय मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतला आहे. या बांधकामासाठी त्यांनी 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. उचगाव भागातील हे पहिले प्रशस्त व मोठे असे मराठा समाज भवन होणार आहे. या भवनमुळे उचगाव परिसरातील सर्व नागरिकांचे लहान-मोठे कार्यक्रम होण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून उचगावमध्ये मराठा समाज भवन बांधण्याची मागणी होत होती. ती मागणी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पूर्ण केलेले आहे. त्यामुळे उचगावमधील नागरिकांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे अभिनंदन केलेले आहे. यावेळी बोलताना मृणाल हेब्बाळकर म्हणाले की, ग्रामीण मतदार संघातील उचगाव, बेळगुंदी, कुद्रेमनी आदी गावामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मराठा समाज भवन बांधण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी माजी अध्यक्ष जावेद जमादार, सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, बंटी पावशे, गजानन नाईक, हनुमंत बुवा, शरद होनगेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. या मराठा समाज भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे काँग्रेसचे नेते युवराज कदम यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.









