मद्यपान करा अन् हँगओव्हरसाठी घ्या सुटी
जपानमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येतील कमतरतेमुळे कंपन्या युवा कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवे मार्ग अवलंबित आहेत. मोठ्या कंपन्या वेतन वाढवत आहेत, तर छोट्या कंपन्या याऐवजी अन्य प्रकारच्या सुट्यांचा लाभ देत आहेत. जपानमध्ये मनुष्यबळाची कमतरता आणि नोकऱ्यांसाठी कमी अर्ज येत असलयाने कंपन्या अजब आणि मजेशीर सुट्यांची ऑफर देत आहेत. ओसाका येथील एक तंत्रज्ञान कंपनी ट्रस्टरिंगने स्वत:च्या ऑफिसकरता स्टाफला आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या असाधारण सुट्यांचे प्रस्ताव दिले आहेत.
हँगओव्हर झाल्यास मिळणार सुटी
या कंपनीत कर्मचारी हँगओव्हरसाठी आता सुटी घेऊ शकतील. यामुळे त्यांना आराम करणे आणि ताजेतवाजने होत कामावर परतण्याची संधी मिळते. एक कर्मचारी आदल्या रात्री मद्यपानानंतर दुपारी कार्यालयात पोहोचले, अतिरिक्त आरामामुळे उत्पादकतेत खुपच सुधारणा झाल्याचे त्याने सांगितले आहे.
फेव्हरेट सेलिब्रिटी
कंपनी ‘सेलिब्रिटी लॉस लीव्ह’ देखील देते. यामुळे कर्मचारी स्वत:च्या पसंतीच्या सेलिब्रिटीकडून विवाहासारखी घोषणा करण्यात आल्यास सुटी घेऊ शकतात. 2021 मध्ये जपानी संगीतकार आणि अभिनेता जेन होशिनाने अभिनेत्री यूई अरागाकीसोबत स्वत:च्या विवाहाची घोषणा केली होती, तेव्हा कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने याकरता सुटी घेतली होती.
सुट्यांचे धोरण अधिक आकर्षक
हे धोरण आम्हाला अन्य कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 2 लाख 22 हजार येन (1400 डॉलर्स मासिक) प्रारंभिक वेतन आणि ओव्हरटाइम वेतनायच प्रस्तावानंतरही क्षेत्रात प्रतिस्पर्धेत राहण्यास मदत करते. आता सुट्यांची ही रणनीती उपयुक्त ठरताना दिसून येत आहे. यामुळे ट्रस्टरिंगने मजबूत व्यावसायिक कामगिरी केली आहे. मागील तीन वर्षांमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याने नोकरी सोडलेली नाही असे कंपनीचे अध्यक्ष दाइगाकू शिमादा यांनी सांगितले.
ऑफिसमध्येच बार
ऑफिसचा अनुभव आणखी चांगला ठरावा म्हणून कंपनीने ऑफिसमध्ये एक बारही तयार केला आहे. अशाप्रकारच्या अनोख्या सुविधांमुळे ही कंपनी ऑनलाइन चर्चेत आहे. अनेक लोकांनी या विचाराची प्रशंसा केली आहे. तर केवळ अतिरिक्त सुटी घेण्यासाठी तेथील स्टाफला आणखी पसंतीचे सेलिब्रिटी शोधावे लागतील असे काही युजर्सनी थट्टेच्या स्वरुपात नमूद केले आहे.









