Fulfillment of villagers’ work by GAIL Gas Company
डेगवे गावातील श्री स्थापेश्वर मंदिराच्या समोरच्या ओहळावर इंडिया गेल गँस पाईपलाईन टाकत असताना तेथील पाण्याचा वापर कोणालाही न विचारता ५ हाँर्सपाँवर असलेला मोटरपंप लावल्याने डेगवे-जांभळवाडीतील बाग-बागायतदारांना , व शेतीला पाणी मिळणे दुरापास्त झाले होते.शिवाय तेथील घाणेरड्या पाण्यामुळे गुरांना,व माणसाच्या जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत होती.त्यामुळे या बाबतीत डेगवे ग्रामपंचायतीचे जागृत सदस्य श्री विजय देसाई व महिला सौ.श्रेया देसाई यांनी सदर काम करणाऱ्या लोकांना रोखून धरले होते त्यानंतर कंपनीने ग्रामस्थांच्या कामाची पूर्तता केली त्यामुळे काम पुन्हा सुरू करण्यास ग्रामस्थांनी परवानगी दिली.
याबाबत कंपनीच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला विचारले .असता ग्रामपंचायतीच्या जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी ग्रामस्थांचा विरोध असतानाही काम करण्यास सांगितले असे उत्तर दिले.त्यामुळे सदर बाबतीत तेथील ग्रामस्थानी संताप व्यक्त करुन सदर प्रश्नावर श्री विजय देसाई व सौ.श्रेया देसाई यांच्या अथक प्रयत्नाने सदर ठिकाणी शोषखड्याची मागणी केली .व ती आता कंपनीने पुर्ण केली आहे.सदर तक्रारी बाबतीत आवर्जून लक्ष दिल्याबाबतीत व तेथील काम करून घेतल्या बाबत जागृत सदस्य विजय देसाई व जागृत महिला सौ.श्रेया देसाई यांचे सर्व ग्रामस्थ कौतुक केले.
बांदा,( प्रतिनिधी)









