पुणे / प्रतिनिधी :
बांधकाम व्यावसायिकाकडून 65 लाखांची खंडणी मागणारा आणि मोक्क्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या सराईत रूपेश मारणेला त्याच्या साथीदारासह मुळशी परिसरातून अटक करण्यात आली.
सराईत रुपेश मारणे आणि संतोष शेलार अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तक्रारदार शेअर मार्केट व्यवसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कुख्यात गुंड गजा मारणे, रुपेश मारणे यांच्यासह टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली. तेव्हापासून रुपेश फरार होता.
अधिक वाचा : हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी
रुपेशने साथीदारांच्या मदतीने आणखी एका बांधकाम व्यवसायाकाकडे 65 लाखांची खंडणी मागितली होती. रुपेशच्या सांगण्यावरून आरोपींनी तक्रारदाराकडून 12 फ्लॅट करारपत्राद्वारे सिक्युरिटी म्हणुन स्वत:कडे घेतले. संबंधित फ्लॅट स्वतः लाटण्याचा प्रयत्न करून अर्जदार यांना धमकावले होते. याप्रकरणी तपास सुरू असताना सराईत रूपेश आणि त्याचा साथीदार मुळशीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.








