सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
श्री शांतादुर्गा सांस्कृतिक मंडळ, कुंभारजुवे आणि गोवा कोकणी अकादमी, पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 5 मार्च रोजी रामभुवनवाडा येथील श्री राम मंदिरच्या मंडपात एक दिवशीय फुगडी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10 वा. ज्येष्ठ भजन, नाट्या, दिंडी व फुगडी कलाकार सुरेखा सुरेश नाईक यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी गोवा कोकणी अकादमीचे उपाध्यक्ष वसंत सावंत, ज्येष्ठ लेखक आणि लोककलेचे अभ्यासक कमलाकर म्हाळशी, कुंभारजुवेचे सरपंच विक्रम परब, पंचसदस्य सुधीर फडते, देवस्थानचे अध्यक्ष सूरज तारी, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भांडारे व सचिव चंद्रशेखर फडते उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात कमलाकर म्हाळशी, दुसऱ्या सत्रात विनायक आखाडकर, तिसऱ्या सत्रात अनिता कुंडईकर तर चौथ्या सत्रात दुर्गाकुमार नावती हे शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक बाबू तथा लक्ष्मण रायकर, लोकनृत्य कलाकार अनिता कुंडईकर, सुरेखा नाईक, प्रशांत भांडारे, सुधीर फडते हे उपस्थित असतील. यावेळी सुरेखा नाईक यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत व चंद्रशेखर फडते करतील.









