नवी दिल्ली
भारतातील इंधनाचा वापर हा गेल्या म्हणजेच एप्रिल महिन्यात कमी राहिला असल्याची माहिती आहे. मार्चच्या तुलनेत मागणी जवळपास 10 टक्के कमी नोंदली गेली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग व अॅनॅलिसीस सेल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इंधनाचा वापर 18.41 दशलक्ष टन इतका एप्रिलमध्ये झाला आहे. वर्षापूर्वी याच महिन्यात हा वापर 18.45 दशलक्ष टन इतका होता. पेट्रोल या इंधनाच्या विक्रीत गेल्या महिन्यात 2.9 टक्के वाढ होत 2.9 दशलक्ष टन इतकी विक्री नोंदली गेली.









