हँगर उभारणीला आला वेग
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावर दोन फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ) मंजूर झाले होते. यापैकी एका एफटीओच्या हँगर उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे लवकरच बेळगावमध्ये वैमानिक तयार करणारे खासगी प्रशिक्षण केंद सुरू होणार आहे.
दिल्ली येथील रेड बर्ड व बेंगळूर येथील समवर्धने या दोन कंपन्यांना एफटीओ मंजूर झाले. फ्लाईंग टेनिंगसाठी हँगर उभारणी करणे आवश्यक होते. परंतु पहिल्या काही दिवसात विविध प्रकारच्या मंजुरीनंतरच्या काळात पावसामुळे विलंब होत होता. मागील 15 दिवसांपूर्वी पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर एफटीओचे काम सुरू करण्यात आले.
मुख्य धावपट्टीपासून एफटीओपर्यंत काँक्रिटचा टॅक्सी ट्रक तयार करण्यात आला. यामुळे मुख्य धावपट्टीपासून एफटीओच्या हँगरपर्यंत एअरक्राफ्ट पोहोचणे शक्मय होणार आहे. गुलबर्गा व इतर जागेच्या एफटीओंची निर्मिती यापूर्वी पूर्ण झाली असली तरी बेळगावमध्ये विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे युद्धपातळीवर एफटीओ हँगर उभारणीचे काम केले जात आहे.









