चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
ऑनलाईन टीम/तरुण भारत
खरी शिवसेना (shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरून शिंदे-ठाकरे यांच्यात वाद सुरु असताना शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेंकांवर टीका करत आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. मात्र, निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आम्ही जिंकून दाखवणारच असं म्हणत विश्वास व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इंस्टाग्रामवर चिन्ह गोठवल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काढलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत उद्धव ठाकरे यांनी “जिंकून दाखवणारच” असे म्हटले.
हे ही वाचा : शिवसेना संपवण्याचा शरद पवारांचा प्लॅन; विजय शिवतारेंचा गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शिवसेनेला फार मोठा धक्का बसला आहे. या निर्णयावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपनेही या विषयी आपली प्रतिक्रिया दिली असून या निर्णयाबाबत त्यांना कुठलीही खंत किंवा आनंदही झाला नसल्याचं म्हण्टलं आहे. तर या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे. तसेच, पुढील संघर्षासाठी आम्ही तयार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले आहे. शिवसेना ही संघर्षातून तयार झाली असून आतदेखील संघर्षातून ती पुढे जाणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हटले.
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








